Skin Care | चेहऱ्यावरील निखार वाढवण्यासाठी वापरा बेसनाचे ‘हे’ स्क्रब

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेवरील (Skin) निखार वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यासाठी अनेकजण नैसर्गिक पद्धतींचा वापर करतात, तर काहीजण यासाठी रसायनिक उत्पादने वापरतात. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी रसायनयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चेहऱ्याची निगा राखण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या बेसनाचा वापर करू शकतात. कारण बेसन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही नियमित बेसनाचे स्क्रब करू शकतात. नियमित बेसनाचे स्क्रब केल्याने त्वचा नैसर्गिक पद्धतीने निरोगी राहू शकते. नैसर्गिक पद्धतीने त्वचेवरील निखार वाढवण्यासाठी तुम्ही बेसनाचे पुढील स्क्रब वापरू शकतात.

चेहऱ्यावरील (Skin) निखार वाढवण्यासाठी वापरा बेसनाचे ‘हे’ स्क्रब

बेसन आणि तांदळाचे पीठ

बेसन आणि तांदळाच्या पिठाचे स्क्रब केल्याने तुमची त्वचा निरोगी राहू शकते. यासाठी तुम्हाला बेसन आणि तांदळाच्या पिठामध्ये दूध मिसळून, त्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तयार झालेल्या या पेस्टने चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिटे हलक्या हाताने मसाज करावी लागेल. या मिश्रणाने स्क्रब करताना हात किंचित ओले ठेवावे. पाच मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाने नियमित चेहऱ्यावर स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून, त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

बेसन आणि हळद

बेसन आणि हळदीचे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि दोन चमचे दूध लागेल. त्यानंतर तुम्हाला हे साहित्य एकत्र मिसळून त्याची घट्ट पेस्ट बनवून घ्यावी लागेल. ही पेस्ट व्यवस्थित तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावून गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने मसाज करावी लागेल. या स्क्रबच्या मदतीने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. त्याचबरोबर या स्क्रबने चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यास देखील मदत होते.

बेसन आणि ओटमील

बेसन आणि ओटमीलचे स्क्रब चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन, एक चमचा ओटमील पावडर आणि दोन चमचे कच्चे दूध लागेल. हे सगळं साहित्य व्यवस्थित मिसळून तुम्हाला त्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला पाच मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करावे लागेल. नियमित या स्क्रबचा वापर केल्याने चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो. त्याचबरोबर या स्क्रबच्या मदतीने चेहऱ्यावरील डेट स्किन कमी होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version