St Bus | जनसामान्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीत संप न करण्याचा ST कर्मचाऱ्यांचा निर्णय

St Bus | मुंबई: सध्या सर्वत्र दिवाळीची चाहूल लागली आहे. अशात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी बस बंद करण्याची मागणी केली होती.

परंतु, एसटी बंदचा संप मागे घेण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांची एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

यानंतर दिवाळी हंगामामध्ये लाल परी म्हणजेच एसटी बस अडथळ्याशिवाय धावणार आहे. या माहितीनंतर जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

उदय सामंत म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर एसटी कष्टकरी जन संघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जर एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्यावर तोडगा काढणं आमचं काम आहे. त्यामुळे या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिवाळीनंतर बैठक होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये वाढ झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेऊन जाहीर करतील. त्याचबरोबर आगामी काळात 2200 नवीन गाड्या येणार आहेत. तर 2025-26 मध्ये 2500 नवीन बस येतील. येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये तब्बल 2500 ईव्ही गाड्या दाखल होणार आहे.”

We want to give reservation to Maratha community – Uday Samant

दरम्यान, राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करत आहे.

या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. अशात संविधनिकदृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते आणि आमचे मतभेद कायम असतील. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे.

यामुळे कुठे फूट पडेल, असं आम्हाला वाटत नाही. याबाबत प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असू शकते. परंतु तरी देखील आम्हाला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.