Maratha Reservation | उपोषण थांबलं असलं तरी आंदोलन सुरूच; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे करणार राज्यभर दौरे

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज आरक्षणासाठी पेटून उठला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी उपोषण सुरू केलं होतं.

त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा राज्यभर दौरे करणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू राहणार आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या 9 व्या दिवशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांनी जरांगे यांना आपलं उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.

त्यांच्या विनंतीचा मान राखत मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. त्यानंतर मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

परंतु, जरंगे यांनी 2 जानेवारीपर्यंतची मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 जानेवारी तर मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबर डेडलाईन असल्याचं जाहीर केलं आहे.

अशात या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर डेडलाईनबाबत स्पष्टता होईल.

Manoj Jarange’s health had deteriorated

दरम्यान, मराठा समाजासाठी (Maratha Reservation) उपोषण करत असताना मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.

त्यामुळे उपोषण स्थगित केल्यानंतर लगेचच त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांचे लिव्हर आणि किडनीवर सूज आली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर मनोज जरांगे यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी आठवडाभर दवाखान्यात राहावं लागणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.