‘मोदी टू द्रौपदी’ अजित पवारांचा प्रवास एक्स्प्रेस झाला – रोहित पवार

Rohit Pawar Vs Ajit Pawar Sambhaji Bhide Narendra Modi

Rohit Pawar Vs Ajit Pawar । महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवार हे राज्यभरात अनेक भेटीगाठी घेत आहेत. पवार यांनी सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सांगलीच्या दौऱ्यासाठी अजित पवार हे हेलिकॉप्टराने कवलापूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर संभाजी भिडे उपस्थित होते. पवार हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर संभाजी भिडे यांना भेटले. भिडे आणि पवार यांच्यात काही वेळ चर्चाही झाली.

यावर आता रोहित पवार यांनी टीका केली आहे, ते म्हणाले महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कथित गुरुजींशी आपली चर्चा झाल्याने त्यांनी भिडे वाड्याला नमस्कार न करण्याचा कानमंत्र आपल्याला दिला दिला का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांची सोशल मीडिया पोस्ट 

मा. अजितदादा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपण सुनेत्राकाकींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंत, याचा आनंद आहे. पण, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता. पण कदाचित नव्या संगतीच्या परिणामाने आपण तिकडं दुर्लक्ष केलं की महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका कथित गुरुजींशी आपली चर्चा झाल्याने त्यांनी भिडे वाड्याला नमस्कार न करण्याचा कानमंत्र आपल्याला दिला, हे माहीत नाही.

पण बाकी काही असो,
आपला ‘मोदी टू द्रौपदी’ प्रवास मात्र एक्स्प्रेस झाला!

Rohit Pawar Vs Ajit Pawar Sambhaji Bhide Narendra Modi

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version