Maratha Reservation | देश गुलामगिरीत होता तेव्हा मराठ्यांनी शौर्याने काम केलं, त्यामुळे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे – धीरेंद्र शास्त्री

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठवाड्यात मोठं आंदोलन उभारलं आहे.

अशात 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजींचा छत्रपती संभाजीनगरमध्ये दरबार भरणार आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान धिरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

The government should discuss with the Maratha community and give them reservation – Dhirendra Shastri

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना धीरेंद्र शास्त्रीजी म्हणाले, “जेव्हा देश गुलामगिरीत होता, तेव्हा मराठा समाजाने शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं आहे.

देशाच्या युद्ध काळात मराठ्यांनी पुढे येऊन योगदान दिलं आहे. त्यामुळं सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून त्यांना आरक्षण (Maratha Reservation) दिलं पाहिजे.”

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे लढा उभा केला.

या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आमरण उपोषण सुरू केलं. तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं.

उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) ठोस तोडगा काढण्यासाठी जरांगे यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

परंतु, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. राज्य शासन या कालावधीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देईल, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.