Job Opportunity | केंद्रीय विद्यापीठ विश्व भारती यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यापीठ विश्व भारती (Central University Vishwa Bharti) यांच्यामार्फत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या एकूण 709 रिक्त जागा (Total 709 vacancies for various posts)

केंद्रीय विद्यापीठ विश्वभारती यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job opportunity) विविध पदांच्या एकूण 709 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये लोअर डिवीजन क्लर्क/जूनियर ऑफिसर असिस्टेंट कम टाइपिस्ट-99 जागा, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)-405 जागा, अपर डिवीजन क्लर्क यूडीसी/ऑफिस असिस्टेंट-29 जागा, सेक्शन ऑफिसर-04 जागा, असिस्टेंट/सीनियर असिस्टेंट-05 जागा, प्रोफेशनल असिस्टेंट-06 जागा, सेमी प्रोफेशनल असिस्टेंट-05 जागा, लाइब्रेरी अटेंडेंट- 30 जागा, लैबरोटरी असिस्टेंट-16 जागा, असिस्टेंट इंजीनियर इलेक्ट्रिकल-01 जागा, असिस्टेंट इंजीनियर सिविल-01 जागा, प्राइवेट सेक्रेटरी-07 जागा, पर्सनल सेक्रेटरी-08 जागा, स्टेनोग्राफर-02 जागा, सीनियर टेक्निकल असिस्टेंट-02 जागा, टेक्निकल असिस्टेंट-17 जागा, सिक्योरिटी इंस्पेक्टर-01 जागा, सीनियर सिस्टम एनालिस्ट-01 जागा, सिस्टम प्रोग्रामर-03 जागा, असिस्टेंट रजिस्ट्रार-02 जागा, असिस्टेंट लाइब्रेरियन-06 जागा, इंटर्नल ऑडिट ऑफिसर (डेप्यूटेशन)-01 जागा, डिप्टी रजिस्ट्रार-01 जागा, लाइब्रेरियन-01 जागा, फाइनेंस ऑफिसर-01 जागा, रजिस्ट्रार-01 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Job opportunity) दिनांक 16 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://vbharatirec.nta.ac.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://vbharatirec.nta.ac.in/downloads/Advt%20No.1-2023.pdf

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://visvabharati.ac.in/

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version