Fatigue Prevention | उन्हाळ्यामध्ये सुस्ती, आळस आणि थकवा टाळण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

Fatigue Prevention | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक सुस्ती (lethargy) आणि आळसाचे (laziness) शिकार होतात. या ऋतूमध्ये शरीर सतत थकलेले जाणवते. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनमुळे अशक्तपणा जाणवायला लागतो. त्यामुळे या वातावरणामध्ये आळस वाढतो. या आळस आणि सुस्तीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात. आहारामध्ये या गोष्टींचा समावेश केल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त देखील राहू शकतात. आळस आणि सुस्तीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील बदल करू शकतात.

प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा (Consume protein rich foods-Fatigue Prevention)

आहारामध्ये प्रोटीनचा समावेश केल्याने थकवा दूर होण्यास मदत होते. माफक प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्याने शरीराला ओमीनो ऍसिड मिळते. यासाठी तुम्ही सकाळी नाष्ट्यामध्ये अंडी खाऊ शकतात. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते, त्यामुळे सकाळी अंड्याचे सेवन केल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावर राहू शकतात.

आहारात विटामिन सीचा समावेश करा (Include vitamin C in your diet-Fatigue Prevention)

उन्हाळ्यामध्ये आळस आणि सुस्तीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात विटामिन सीचा समावेश करू शकतात. यासाठी तुम्ही लिंबू, मोसंबी इत्यादी लिंबूवर्णीय फळांचे सेवन करू शकतात. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, त्यामुळे या फळांचे सेवन केल्याने पचनक्रियाही मजबूत होते. उन्हाळ्यामध्ये विटामिन सीयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्ही आळस आणि सुस्तीपासून दूर राहू शकतात.

गोड पदार्थांपासून दूर राहा (Stay away from sweet foods-Fatigue Prevention)

उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. त्याचबरोबर या गरम वातावरणामध्ये गोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्ही आळस आणि सुस्तीचे शिकार होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये लोक थंड पेयांचे सेवन करतात. त्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी गोड पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे.

उन्हाळ्यामध्ये आळस आणि सुस्तीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर कारल्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

डायबिटीससाठी फायदेशीर (Beneficial for diabetes-Bitter Gourd Benefits)

तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर कारल्याचे नियमित सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नियमित कारल्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीरही निरोगी राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Bitter Gourd Benefits)

कारल्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. कारल्यामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन डोळ्याची दृष्टी वाढवण्यासोबतच डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. कारल्याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version