संयम ठेवला, अंत पाहू नका; मनोज जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सज्जड दम

eknath shinde vs manoj jarange

Eknath shinde Vs Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना  झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठीची भावना होती तेव्हा मी त्याच्याबरोबर होतो. मात्र, आता त्याची भाषा राजकीय वाटतं आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. आंदोलनकर्त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. कोणीही संभ्रम पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावताय का हे पाहावं लागेल. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होता कामा नये. कोणाला वाटत असेल सरकारला काही माहिती नाही. तर, सरकार, गृह विभाग सगळं लक्ष ठेवून आहे असा मोठा इशारा त्यांनी दिला.

सरकारने संयम ठेवलेला आहे, अंत पाहू नका- एकनाथ शिंदे

जी मागणी केली होती त्यानुसार आम्ही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द पाळला आहे. आता आरक्षण दिल्यावर मागणी बदलणं म्हणजे तुम्ही राजकारण करू लागले आहात.

मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.