… तर पोलिसांना कारवाई करावीच लागेल; मनोज जरांगेंवर पोलीस कारवाईचे संकेत

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना  झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा सर्वानीच चालवली पाहिजे. मराठा आरक्षणाबद्दल राज्यप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. मार्ग काढायचा प्रयत्न केला.

जालना येथे गेले. नवी मुंबईला गेले. तरीही शिवराळ भाषा वापरली जात आहे. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, अधिकाऱ्यांना बोलतानाही त्यांच्याशी शिवराळ भाषा वापरली जात आहे. हे नेमकं कोण करतंय हे पाहणं गरजेचं आहे असे अजित पवार म्हणाले.

तर देवेन्द्र फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

सागर बंगला हा सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं.कोणाचीही अडवणुक नाही. कुठल्या निरशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवी आहे ते मला माहिती नाही. ते जे बोलले ते बिन बुडाचे आरोप असून धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे. मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळ ही सुरु केली. सर्व योजनांची सुरूवात मी केल्याचं फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षण हाय कोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोललं म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब बोलत होते. तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलता आहेत हा प्रश्न आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारने संयम ठेवलेला आहे, अंत पाहू नका- एकनाथ शिंदे

जी मागणी केली होती त्यानुसार आम्ही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द पाळला आहे. आता आरक्षण दिल्यावर मागणी बदलणं म्हणजे तुम्ही राजकारण करू लागले आहात. मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.