Maratha protesters जालना । मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Police lathi charge on Maratha protesters

Maratha Protesters । आजपासून गावोगावी सकाळी ११ पासून रास्तारोको आंदोलन करा, दुपारी एक वाजेपर्यंत रास्तारोको करा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केले होते. आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असा सल्लाही जरांगेंनी दिला होता.

मनोज जरांगे यांनी सगयासोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी  आजपासून आंदोलनाची हाक दिलीय. आज राज्यभरात एक दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या नंतर आंदोलक पोलिस स्टेशनमध्ये घुसले आहेत.

25 फेब्रुवारीपासून राज्यभरात गावागावात ग्रामपंचायत किंवा मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्याचे अवाहन जरांगे यांनी केलंय. तसचं 25 पासून होणाऱ्या धरणे आंदोलना दरम्यान दररोज आपल्या सगयासोयऱ्याच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधीला द्यायचे आहे.

हे निवेदन गावात 10 च्या आत शासनाचा प्रतिनिधी आला पाहिजे तो न आल्यास ,रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे जरांगेंनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.