उपोषण करत असताना सुद्धा जरांगेंचा आवाज मात्र खणखणीत आणि मोठा- छगन भुजबळ

chhagan bhujbal vs manoj jarange

chhagan bhujbal vs manoj jarange | मनोज जरांगे पाटील मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना  झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

गेल्या पंधरा ते सोळा दिवसापासून ते उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती खालावलेली दिसत आहे. काल रात्रीपासून त्यांनी पाणीही न पिता कडक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले कि, मला मोठे आश्चर्य वाटते, उपोषण करत असताना सुद्धा त्यांचा आवाज मात्र खणखणीत आणि मोठा आहे. हे कसे काय आहे, ते १० लोकांना सुद्धा ऐकत नाहीत. एव्हडी शक्ती त्यांना उपोषण कर्त्यांना कशी काय आली? हे सुद्धा मोठे आश्चर्य आहे, वैद्यकीय क्षेत्रात. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

मनोज जरांगे (Manoj Jarange ) फडणवीसांवर काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे.

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.

छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी केवळ समाजाचा आहे. समाज माझा देव आहे आणि माझी समाजावर निष्ठा आहे. कुणी तरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे. छगन भुजबळ यांना फडवणीस यांच्यामुळे अजित पवार यांच्याकडे जावे लागले.

महत्वाच्या बातम्या

तुला माझा बळी पाहिजे ना! मी सागर बंगल्यावर येतो; जरांगे पाटलांचे देवेन्द्र फडणवीसांवर गंभीर आरोप

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.