Rahul Gandhi | राहुल गांधींचं वर्ड पझल ट्वीट चर्चेत; वाचा सविस्तर!

Rahul Gandhi | नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व
मोदी या आडनावाचे सगळे लोक चोर का असतात? हा प्रश्न विचारल्यानंतर दाखल झालेल्या केसमध्ये गेलं आहे. तर पुन्हा त्यांनी सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या अदानी प्रकरणावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानीच्या मुद्द्यावर जास्तच गदारोळ झाला असल्याचं म्हणत अदानीची पाठराखण केली असल्याचं म्हंटलं जातं आहे. तसंच नावही माहित नसलेल्या कंपनीच्या अहवालावरून इतका गदारोळ करणं योग्य नाही असं म्हणत पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले आहेत. परंतु राहुल गांधी मात्र गौतम अदानींचा मुद्दा सोडायला तयार नाहीत असं त्यांनी आज केलेल्या एका वर्ड पझल ट्वीटमधून दिसून येत आहे.

तसंच राहुल गांधी यांनी केलेल्या त्या ट्वीटमध्ये काही लोकांची नावं आहेत आणि ती नावांमध्ये अदाणी हे नाव कसं लपलं आहे हे त्यांनी दाखवलं आहे. याचप्रमाणे त्याखाली लिहलं आहे की, यातील लोक सत्य लपवतात म्हणूनच रोज लोकांची दिशाभूल करतात. तर अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुणाचे आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे. त्यामध्ये त्यांनी गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांची नावं लिहिली आहेत. त्या नावांमधून मोठ्या अक्षरात अदानी हे नाव कसं समोर येतं हे या वर्ड पझलमध्ये दाखवलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान,राहुल गांधी यांच्या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत असून राहुल गांधींच्या वर्ड पझलमध्ये पहिलं नाव आहे ते गुलाब नबी आझाद यांचं आहे. तर डी या अक्षरासाठी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आडनावाचा वापर केला आहे. खरंतर शिंदे कुटुंब हे पक्के काँग्रेसी होते. तसंच ज्योतिरादित्यांचे वडील आणि राजीव गांधी यांची खास मैत्री असं सांगण्यात येत. परंतु, २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता राहुल गांधींनी वर्ड पझलच्या माध्यमातून चर्चेत आले आहेत.

 

Exit mobile version