MPSC Recruitment | MPSC मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील गट-ब आणि गट-क या संवर्गातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

एमपीएससीच्या (MPSC Recruitment) परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एमपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (MPSC Recruitment) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये प्राचार्य/ संचालक, मराठी अनुवादक (गट-क) आणि हिंदी अनुवादक (गट-क) आणि सहायक वन सांख्यिकी (गट-ब) पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://mpsconline.gov.in/candidate

राज्य सरकारच्या या भरती (MPSC Recruitment) प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती (MPSC Recruitment) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://mpsc.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1nKD3wT_JvcXfRncOJRYfN_Rn_hDCL2sC/view?pli=1

https://drive.google.com/file/d/1uuu-wDyhg1iObKfMpgpCfDfCzDyXvvag/view

https://drive.google.com/file/d/1BWJ_BYnrFggnZ8qNZd2zMziLPTsC9Vgh/view

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.