PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2 हजार ऐवजी 3 हजार रुपये मिळणार? पाहा अपडेट

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते.

अशात आत्तापर्यंत या योजनेचे (PM Kisan Yojana) 14 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहे. शेतकरी या योजनेतील 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. या योजनेतील पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळू शकतो, अशा चर्चा सुरू आहे.

An installment of two thousand rupees can be three thousand rupees

पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. या मदतीध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) सहा हाजारांऐवजी नऊ हजार रुपये दिले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता तीन हजार रुपये होऊ शकतो.

मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, जमिनीची पडताळणी आणि आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana)  सुरू केली आहे.

कोट्यावधी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळवला आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पीएम किसान पोर्टल वर जाऊन, यासाठी नोंदणी करू शकतात.

त्याचबरोबर या योजनेची संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.