Manoj Jarange यांच्यावर सरकारची मोठी कारवाई? परवानगी नाकारली

Manoj Jarange | मनोज जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी पायी मुंबई कडे निघाले आहेत.  मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे या प्रमुख मागण्या घेऊन जरांगे मुंबईला निघाले आहेत.

मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे आणि मराठा समाज मुंबईत येऊ नये म्हणूनच ही परवानगी नाकारल्याचे बोलले जात आहे.

मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा समाज मुंबईला येणार नाही, हे आंदोलन मुंबईला येण्याआधी इतर आंदोलना प्रमाणे चिरडून टाकू या गैरसमजात सरकार होते. त्यामुळे आंदोलनाला उशिरा परवानगी नाकारल्याचे बोलले जात आहे.

काहीतरी करून मनोज जरांगे आणि मराठा समाजाला मुंबई बाहेर रोखण्यासाठी सरकार कुरापत्या करत आहे. पण जरांगे यांनी मुंबईला येण्याचा निर्धार केला आहे. आरक्षण तर घेणारच आणि तेही ओबीसीतूनच, त्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचे जरांगे यांनी म्हंटले आहे.

आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची क्षमता कमी असल्याचे सांगत उपोषणासाठी पोलिसांनी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे.

Police denied permission to Manoj Jarange

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे ७००० स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० ते ६००० आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानावर पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत.

तसेच उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान ३०२४/प्र.क्र. १२/२०२४/कीयुसे-१, दि. २४.०१.२०२४ अन्वये तेथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत येणार असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे.

आंदोलक प्रचंड संख्येचे असल्याने मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.