Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांवर पोलीस कारवाईचे मोठे संकेत

Nikhil Wagle Social Media Post on Manoj Jarange Patil

Manoj Jarange | मनोज जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी पायी मुंबई कडे निघाले आहेत. हा मोर्चा पुण्यात पोहचला आहे. अनेक संकटे आणि सरकारच्या कुरापत्या पार करत हा मोर्चा पुण्यात पोहचला आहे.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे या प्रमुख मागण्या घेऊन जरांगे मुंबईला निघाले आहेत. आता मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांना रस्त्यातच रोखण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

मनोज जरांगे यांना माध्यमातून कसे गायब करता येईल यावर प्रकाश टाकणारी बातमी महाराष्ट्र देशाने या पूर्वीच प्रकशित केली होती. त्यानंतर सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला.

मराठा समाजाने त्याच ताकदीने स्वतःचा मीडिया तयार केला आणि इतर आंदोलने सरकार जशी चिरडून टाकते, तसे या आंदोलनाला चिरडून टाकता आले नाही.

सरकार दबाव टाकते याचा प्रत्यय आज छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील प्रमुख दैनिकांमधून दिसून आला. मराठा आंदोलन महाराष्ट्रभर गाजत असतांना पहिल्या पानांवर असलेले जरांगे आज प्रमुख दैनिकांमधून गायब होते.

Manoj Jarange Police Action Indication

मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा समाजाला कसे रोखावे यासाठी सरकार अनेक कुपत्या लढवत आहे. मराठा समाजाचा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तोटा होऊ नये म्हणून भाजप शांततेच्या भुमीकेत आहे तसेच यातून देवेंद्र फडणवीसांना दूर ठेवले आहे.

मराठा चेहरा म्हणून भाजपने राष्ट्रवादीच्या अजित पवारांना पुढे केले, परंतु मराठा समाजाने अजित पवारांना जुमानले नाही. उलट पवारांवर टीकेची झोड उठवली. २० वर्षे तुम्ही मराठ्यांसाठी काय केले हा प्रश्न मराठा समाज पवारांना विचारत आहेत.

आता मनोज जरांगे यांच्यावर पोलीस कारवाईचे संकेत जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी दिले आहेत. ते म्हणतात,  ”गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचं मनातही आणू नये. संयम बाळगा!”

Nikhil Wagle Social Media Post

Manoj Jarange Police Action Indication

मनोज जरांगे आणि लाखो मराठा समाज मुंबईत आला तर कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून शेवटचे अस्त्र म्हणून त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाऊ शकते असे संकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.