Ayodhya Ram Mandir । उद्धव ठाकरेंच्या आधी महाराष्ट्रातील ‘या’ सरपंचाला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण

Ayodhya Ram Mandir | अहमदनगर | अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारलं गेलं आहे. या मंदिराचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही, असे असतांना मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यास अनेकांनी विरोध केला आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अर्धवट आहे ते पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागणार आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपाला झाली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

अयोध्येत उद्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. देशविदेशातील भाविकही या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत.

Uddhav Thackeray Gets Invitation For Ayodhya Ram Temple Inauguration By Speed Post

महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्यांना राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील सोहळ्याचं स्पीड पोस्टने उशिरा निमंत्रण देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निमंत्रण देण्यात आलं आहे, त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजपच्या या वागण्याला भगवान रामही कधीच माफ करणार नाही. भगवान राम तुम्हाला शाप देतील. तुम्ही भगवान रामाची प्रार्थना करता आणि रावणासारखं सरकार चालवता का? असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Popatrao Pawar Get Invitation Ayodhya Ram Mandir Inauguration Program

या कार्यक्रमाचं महाराष्ट्रातील दिग्गजांसोबतच हिवरे बाजार गावाचे सरपंच पोपटराव पवार यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपनेचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.