Manoj Jarange | मराठ्यांना आरक्षण मिळणार? मनोज जरांगे 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे धडपड करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

या कालावधीमध्ये राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देईल, असा विश्वास जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर 15 नोव्हेंबर पासून मनोज जरांगे महाराष्ट्र दौरा करणार आहे.

Manoj Jarange commented on Maratha reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी मी महाराष्ट्र दौरा करणार आहे.

15 नोव्हेंबर 2023 पासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत हा दौरा सुरू राहणार आहे. मी 15 नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा आणि करमाळा दौऱ्यावर असणार आहे.

त्यानंतर 23 नोव्हेंबर पर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. त्याचबरोबर 01 डिसेंबर पासून महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू केलं जाणार आहे.

सर्वांनी साखळी उपोषण सुरू करण्याची तयारी आतापासून सुरू करावी. आमच्या या दौऱ्यासाठी कुणीही अधिकारी किंवा नेता पैसे देत नाही. त्याचबरोबर यासाठी आम्ही कुणाकडून पैसे घेत नाही. आम्ही स्वतःचा खर्च स्वतःच करतो.”

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

उपोषणाच्या नवव्या दिवशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.