MPSC Recruitment | MPSC मार्फत नोकरीची संधी! त्वरित करा अर्ज

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (MPSC Recruitment) प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन/ऑनलाईन ईमेलद्वारे (MPSC Recruitment) अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (MPSC Recruitment) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये अवर सचिव/ कक्ष अधिकारी – 01, सहायक कक्ष अधिकारी – 02, लिपिक टंकलेखक – 01 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

उमेदवारांना खालील ई-मेल पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे. त्याचबरोबर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा (MPSC Recruitment) लागेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशूल गोल्ड फिल्ड नंबर 34, सरोवर विहार समोर, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता (E-mail address to send application)

so-establishment@mpsc.gov.in

दरम्यान, दिनांक 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने उमेदवारांना अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या भरती (MPSC Recruitment) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://mpsc.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://mpsc.gov.in/downloadFile/english/7943

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.