Weather Update | ऐन दिवाळीत पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. अशात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अशात पुण्यासह रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे.

Rain warning in some districts for the next four days

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात पाऊस आणि ढगाळ वातावरण (Weather Update) निर्माण झालं आहे.

अशात काल (9 नोव्हेंबर) मुंबई उपनगरांमध्ये अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. अशात पुढील चार दिवस ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे.

त्याचबरोबर अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे.

Benefits of Dates

दरम्यान, राज्यात काही जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. तर बहुतांश ठिकाणी थंडी वाढत चालली आहे. पहाटेच्या वेळी थंडी अधिक असल्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहे.

अशात या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजुराचा समावेश करू शकतात. कारण खजुरामध्ये आढळणारे पोटॅशियम, फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम आरोग्यासाठी पोषक ठरू शकतात.

त्याचबरोबर दररोज तीन ते चार खजुराचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजुराचा समावेश करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.