‘झुक एज’ नवीन स्मार्टफोन बाजारात

मुंबई : लेनोवो कंपनीचं सबब्रँड ‘झुक’ने  नवा स्मार्टफोन ‘झुक एज’ लॉन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनची 1 जानेवारीपासून चीनमधील बाजारात आगमन होणार आहे. 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असे व्हेरिएंट स्मार्टफोन आहे.

4 जीबी रॅम व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत अंदाजे 22 हजार 500 रुपये  तर 6 जीबी व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत अंदाजे 24 हजार 500 रुपये एवढी आहे. सिरेमिक व्हाईट, टायटॅनियम आणि क्रिस्टल ब्लॅक या रंगांमध्ये दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध असतील.

 फीचर्स बघा :

  • 5 इंचाचा एचडी रिझॉल्युशन स्क्रीन
  • कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
  • 35GHz क्वार्ड कोर स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट
  • टाईप-सी पोर्ट
  • U टच फिंगरप्रिंट सेन्सर
  • ड्युअल सिम स्लॉट
  • 0 नॉगट ओएस ऑपरेटिंग सिस्टम
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 64 जीबी इंटरनल स्टोरेज (स्टोरेज वाढवण्याची सुविधा)
  • 3100mAh क्षमतेची बॅटरी