17 सप्टेंबरपासून झोमॅटो कंपनीची ‘ही’ सेवा होणार बंद

zomoto

मुंबई: ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटो अनेकदा आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर घेऊन येतात. मात्र यावेळी कोणतीही ऑफर घेऊन न घेता झोमॅटो आता 17 सप्टेंबरपासून एक सेवा बंद करण्यात आली आहे. अपुऱ्या सेवामुळे हि सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑर्डर पूर्ण होण्यास होणारा विलंब, ग्राहकांचा अल्प प्रतिसाद आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. इतर स्पर्धक कंपन्या मालाच्या घरपोच डिलिव्हरीसाठी 15 मिनिटं लागतात परंतु झोमॅटोला ही सेवा पुरवण्यासाठी अधिक वेळ लागल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना काळात भारतात ऑनलाइन किराणा वितरण व्यवसायात मोठी वाढ झाली. अनेक कंपन्या 10 मिनिटांच्या आत ही सेवा देत आहेत.

त्यामुळे आता झोमॅटोन ग्रॉफरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ईमेलमध्ये म्हटले आहे की, “झोमॅटो आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यावर आणि आमच्या व्यावसायिक भागीदारांना वाढीच्या सर्वात मोठ्या संधी देण्यावर विश्वास ठेवते. आमच्या ग्राहकांना आणि व्यावसायिक भागीदारांना असे फायदे देण्याचा सध्याचे मॉडेल हा सर्वोत्तम मार्ग आहे असे आम्हाला वाटत नसल्याने  आम्ही 17 सप्टेंबर 2021 पासून किराणा मालाची प्रायोगिक वितरण सेवा बंद करू करणार आहोत’.

झोमॅटोने जुलै महिन्यात प्रायोगिक तत्वावर काही शहरांमध्ये किराणा वितरण सुरू केले होते. कंपनी 45 मिनिटांच्या आत किराणा पोचवत होती, हा कालावधी स्पर्धकांपेक्षा खूप जास्त आहे. कंपनीने जुलै 2021 मध्ये ही सेवा सुरू केली. झोमॅटोने ग्रॉफर्समध्येही गुंतवणूक केली असून याची कंपनीमध्ये 10 टक्के हिस्सेदारी आहे.

महत्वाच्या बातम्या :