औरंगाबादमध्ये पुन्हा झुंडशाही, ‘जय श्री राम’ वरून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयना बेदम मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशात सध्या ‘जय श्री राम’ या घोषणेवरून वातावरण तापलेले दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी ‘जय श्री राम’ ही घोषणा द्या अशी सक्ती करण्यात येत आहे. अशातच औरंगाबादमधेही असाच प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद शहरातील आझाद चौक येथे मध्यरात्रीच्या सुमारास झोमॅटोचे दोन डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून ऑर्डर पोहोचवण्यासाठी जात असताना परिसरातील काही जणांनी त्यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच या डिलिव्हरी बॉयना ‘जय श्रीराम’चे नारे लावण्यासही जबरदस्ती केली. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्येच काही दिवसांपूर्वी कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लिम तरुणास अडवून मारहाण करत त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली होती.