fbpx

टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपट बघण्याकडे जिल्हा परिषद सदस्यांनी फिरविली पाठ

toilet ek prem katha

नाशिक : जिल्हा हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट साध्य होत न ते ध्येय निश्चितीसाठी चित्रपट अभिनेता अक्षयकुमारच्या टॉलयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाचा आधार घेत तो दाखविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला खरा. मात्र, टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट बघण्याकडे पदाधिकाऱ्यांसह, सदस्यांनी काल पाठ फिरविल्याचे चित्र होते. हातावर मोजण्याइतकयाच सदस्यांनी हजेरी लावली. चित्रपट दाखविण्यासाठी केलेला खर्च शौचालयासाठी दिला असता तर शौचालये उभी राहिली असती,अशा प्रतिक्रीया सदस्यानी व्यक्त केल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी असलेले उद्दिष्टये साध्य होत नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जि.प. च्या पाणी व स्वच्छता कक्षाच्या वतीने जि.प. पदाधिकारी, सदस्य, खातेप्रमुख, गटविकास अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाच्या शो चे उंटवाडी येथील सिनेमक्स सिनेमागृहात काल आयोजन करण्यात आले होते.

चित्रपटासाठी अध्यक्षा शीतल सांगळे, उषा नयना गावित, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अति मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजेंद्र पाटील यांच्यासह सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ७३ सदस्यांची तिकीटे काढण्यात आली होती. परंतु १० ते १२ सदस्यांनीच चित्रपटासाठी हजेरी लावली.

अखेरिस ही तिकीटे खातेप्रमुखाना देण्यात आली. प्रारंभी पदाधिकाऱ्यांसह अनेक सदस्य यावेळी गैरहजर होते. यातही अनेक सदस्य चित्रपट न बघताच निघून गेले. विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना सक्ती असल्याने ते मीना यांच्या भीतीने हजर होते.  त्यामुळे जि.प. ने आयोजीत केलेला टॉलयलेट एक प्रेमकथा हा फ्लोप शो ठरल्याची चर्चा होती.

चित्रपट पाहून आलेल्या अनेक सदस्यांनी चित्रपटातून शौचालये पूर्ण होणार का ? असा सवालही उपस्थित केला. अजूनही अट्टाहास, सरपंच, ग्रामसेवकांसाठी चित्रपट आयोजनाचा हट्टाहास सुरू असल्याचे समजते. पदाधिकारी यांनीच पाठ फिरविल्याने सरपंच, सदस्य येणार का ? केवळ खर्चासाठी चित्रपटाचे आयोजन करणार असे प्रश्न सदस्य उपस्थित करत आहेत.