महावितरणाची शून्य थकबाकी मोहीम; कर्मचारी व अधिकारी नीलंबीत

औरंगाबाद: महावितरणाची थकबाकी वसुल मोहीम जोरात चालु आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणार-या छावनी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक माने यांच्यासह ९ कर्मचारी व अधिकाऱ्यांना नीलंबीत केले. अन्य २१अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध आरोप पत्र दाखल झाले आहेत. तर १५२ कर्मचाऱ्याना नोटिसा बजावल्या आहेत.

ग्राहकांकडे एक लाखाच्यावर थकबाकी रक्कम असताना त्यांच्याकडून फक्त शभंर दोनशे रुपये वसूल केले. हा सर्व प्रकार कराण्यात आलेल्या बिलतपासणी मध्ये उघडकीस आला. या मोहिमेत अधिकारी व कर्मचारी दारोदार फिरून थकबाकी वसूल करत आहेत जे ग्राहक याला प्रतिसाद देत नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. कामचुकारपणा करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून त्यांच्या पगारातून ५ लाख २२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. ग्राहकांकडे कोट्यवधी रूपयांची रक्कम थकीत असल्यामुळे महावितरणाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे महावितरणाने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे.

काय आहे शून्य थकबाकी मोहीम ?

औरंगाबाद महावितरणाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे त्यामुळे महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांना घरोघरी पाठवुन वीजग्राहकांकडून थकलेल्या बिलाची रक्कम वसूल करत आहे. जी लोक कर्मचाऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. जी कर्मचारी कामचूकारपना करतात त्यांना दंड ठोठावला जात आहे .

You might also like
Comments
Loading...