हिरो ठरले झिरो! इंग्लंडच्या भूमिवर भारतीय फलंदाज पुन्हा अपयशी

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे संपुर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने ४ गडी गमावत १२५ धावा केल्या होत्या. भारतीय संघ अद्यापही ५८ धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजानी चांगली कामगीरी करत सामन्यावर पकड बनवण्याची चांगली संधी निर्माण केली होती. मात्र भारतीय फलंदाजानी या प्रयत्नावर पाणी फेरले आहे. बीनबाद ९७ वरुन भारतीय संघाची अवस्था ४ बाद १२४ अशी झाली. सामन्यापुर्वी आत्मविश्वासाने फलंदाजी करणार असे बोलणारा कर्णधार कोहली भोपळा न फोडताच बाद झाला.

तर डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील अपयशी कामगीरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारा या सामन्यातही लवकर बाद झाला. त्याने १६ चेंडुत केवळ ४ धावा केल्या. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सावरावा अशी अपेक्षा असताना गरज नसताना धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. खेळपट्टीवर आता सलामीवीर के एल राहुल आणि रिषभ पंत दोघे खेळत होते. हे दोघे कशी फलंदाजी करतात यावर या सामन्याचा निकाल अवलंबुण आहे.

महत्त्वाच्या बातम्या