ZEN Admire Sense- फोर-जी नेटवर्कयुक्त झेन अ‍ॅडमायर सेन्स

झेन मोबाईल्स कंपनीने फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा झेन अ‍ॅडमायर सेन्स हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ५,९९९ रूपये मुल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.

झेन अ‍ॅडमायर सेन्स हे मॉडेल देशभरातील ऑफलाईन स्टोअर्समधून ग्राहकांना खरेदी करता येईल. यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजेच ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील फ्रंट आणि बॅक हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील.