एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार प्रदान

मुंबई:  आपल्या नवनवीन कामगिरीने तसेच बहुरंगी कर्तुत्वाने नेहमीच सोलापूरकरांना आनंदाचा क्षण देणारा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना नुकताच झी युवा चा साहित्य सन्मान पुरस्कार मिळाला आहे. गिर्यारोहणातील कामगिरीशिवाय प्रथमच आनंदच्या लेखनाला हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी आनंदला वेगवेगळे प्रश्न विचारून आनंदचा संघर्ष सर्वांसमोर आणला.

महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील युवकांना जगासमोर आणण्यासाठी झी युवा ने २०१७ मध्ये अतिशय मनाच्या या पुरस्काराची सुरवात केली. आनंद सोबतच हा पुरस्कार अनेक दिग्गज लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे.आनंद बनसोडे यांनी त्यांनतर अतापर्यंत जगातील ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. तसेच स्वप्नातून सत्याकडे, ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा, स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, स्वप्नपूर्तीचा खजिना इ. पुस्तके लिहिली आहेत.

सोशल मिडियावर लिखाणातून अनेकांना प्रेरणा देतच असतो. लेखनातील ही सर्व कामगिरी लक्षात घेवून 2018 चा साहित्य सन्मान पुरस्कार आनंद ला देण्यात आला. उद्या. दि. १९ रोजी संध्याकाळी ७ वाजता या पुरस्काराचे प्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर होणार आहे.

 

यांना मिळाला पुरस्कार-

राजकारण- मा. आदित्य ठाकरे

साहित्य- एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे

खेळ- कुस्तीपटू राहुल आवारे

अभिनय-  डॉ. निलेश साबळे

अभिनय – श्रेया पिळगावकर

सामाजिक- संतोष गर्जे