नाशिक : नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते.
या ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती. 21 एप्रिल रोजी नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता या गॅस गळती प्रकरणाचा ठपका ठेकेदार कंपनीवर ठेवण्यात आला आहे. संबधित ठेकेदाराच्या कंपनीच्या निष्कळजीपणामुळे हि दुर्घटना झाल्याचा निष्कर्ष आता काढण्यात आला आहे.
दरम्यान यावेळी ऑक्सिजन गळतीनंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय. सरकारच्या सूचनेनुसार नाशिक महानगरपालिकेनं पुण्यातील ताईवो निपॉन कंपनीला 22 लाख तर जाधव ट्रेडर्सला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे एकूण 24 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ; ईडीच्या चौकशीत आली ‘ही’ माहिती समोर
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<