झायरा वसीमची छेड काढणाऱ्या प्रवाशावर कारवाई करा – नीलम गोऱ्हे

मुंबई : अभिनेत्री झायरा वसीम हिच्याबरोबर झालेल्या गैरवर्तणुकी प्रकरणी संबंधित प्रवाशावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. विमान कंपनीने त्या प्रवाशावर कारवाई करून त्या व्यक्तीने झायराची सर्वांसमोर जाहीर माफी मागावी.

तसेच तो ज्या ठिकाणी काम करतो त्या कंपनीनेही त्याच्या असभ्य वर्तणुकीची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, विमानातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

You might also like
Comments
Loading...