झहीरला सारिकाने केले क्लीनबोल्ड

मराठमोळा क्रिकेटपटू झहीर खान व अभिनेत्री सागरिका घाटगे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सागरिका सोबत एन्गेज झाल्याचं झहीरने ट्विट केले आहे. झहीरनं दोघांचा अंगठी घातलेला फोटोही ट्विटरवर पोस्ट केला आहे. तुमच्या पत्नीच्या पसंतीवर कधीही हसू नका, तुम्ही तिच्या निवडीपैकीच एक आहात. पार्टनर फॉर लाईफ, एन्गेज्ड सागरिका घाटगे, असे या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे.

चक दे इंडियात सागरिकाने क्रिकेटरच्या प्रेयसीची भूमिका निभावली होती. आता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही क्रिकेटपटू झहीर खानसोबत सागरिका एन्गेज झाली आहे. युवराज सिंह व हेजल कीच यांच्या लग्नातही झहीर खान आणि सागरिका घाटगे याच जोडीवर सर्वांचं लक्ष होते.