यजुवेंद्र चहल अडकणार लग्नबंधनात ?

वेब टीम – भारतीय कर्णधार विराट कोहलीनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच सांगण्यात येत आहे. यजुवेंद्र चहल लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची बातमी ‘जनसत्ता’ यांनी दिली होती. चहल सध्या कन्नड सिने अभिनेत्री तनिष्का कपूरला डेट करत आहे. तनिष्का सोबत अनेक कार्यक्रमांमध्ये यजुवेंद्र चहल दिसून आला होता. आयपीएलनंतर चहल आणि तनिष्काचा विवाह होऊ शकतो असा तर्क लावला जातोय.

परंतु यजुवेंद्र चहल याने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. पुढे त्याने सांगितले कि माझ्या आयुष्यात असे काही चालू नाही आहे, जसे तुम्ही विचार करत आहात. तनिष्का आणि मी खूप चांगले मित्र आहोत, असे सांगून त्याने लग्नाच्या बातम्यावर पडदा टाकला.

 

You might also like
Comments
Loading...