fbpx

निवृत्तीची घोषणा करताना युवराजला अश्रू अनावर झाले

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा सिंह आणि सिक्सर किंग युवराज सिंग याने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत युवराज ने आपली निवृत्ती घोषित केली. यावेळी युवीच्या आज पर्यंतच्या कारकिर्दीचा जीवनपट दाखवण्यात आला. त्यावेळी युवराज भावूक झाला असून त्याला अश्रू अनावर झाले. यावेळी आजपर्यंतच्या जडणघडणीत अनेकांचा हातभार लागला असे सांगत त्याने आभार मानले.

संधी मिळत नव्हती आणि यश येत नव्हतं म्हणून निवृत्तीच्या विचारात होतो. आयुष्यात सगळं मिळत नाही., असे म्हणत युवराजने आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या आयपीएलमध्ये थांबण्याचा विचार आला होता. पण आता थांबत आहे. मी निवृत्ती संदर्भात माझ्या टीम बॅचच्या मित्रांना सांगितलं होतं, त्यांच्याशी चर्चा देखील केली होती. असे युवराज म्हणाला.

यावेळी युवराजने बीसीसीआय बाबत खंत देखील व्यक्त केली. तो म्हणाला की, मला बीसीसीआयने शेवटची मॅच खेळण्याबाबत विचारणा केली नाही, ना मी बीसीसीआयकडे त्याबाबत इच्छा व्यक्त केली.आजपर्यंतच्या जडणघडणीत अनेकांचा हातभार लागला असे सांगत त्याने सगळ्यांचे आभार मानले.

युवराज सिंगने भारताकडून ३०४ वन डे सामन्यात ८७०१ धावा केल्या आहेत. यामध्ये १४ शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.शिवाय युवराजने ४० कसोटी सामन्यात १९०० धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी २० स्पेशालिस्ट युवराजने ५८ सामन्यात ८ अर्धशतकांसह ११७७ धावा केल्या आहेत.