नितीश राणावर भडकले युवराज सिंगचे चाहते ; केली ‘अशी’ मागणी

nitish rana

श्रीलंका : भारतीय संघाची श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय मालिकेची सुरुवात रविवारी (18 जुलै) रोजी प्रेमदासा स्टेडियमवर सुरु झाली. या दौऱ्यासाठी राहुल द्रविड यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. तसेच मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

रविवारी १८ जुलै रोजी झालेल्या एकदिशीय सामन्यात श्रीलंकेवर मात करत भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत अगदी सहज पार केले. यासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली.

दरम्यान, श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय खेकडूवरून एक नवा वाद निर्माण झाला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी नितीश राणा याची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली. पहिल्या एकदिवशीय सामन्यात नितीश राणाला संधी मिळाली नसली, तरी नितीशच्या जर्सीमुळे चाहते नाराज झाले आहेत.

नितीश राणा याच्या जर्सीवर 12 क्रमांक असल्यामुळे युवराज सिंगच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे, तसंच नितीशला वेगळ्या क्रमांकाची जर्सी देण्यात यावी, अशी मागणी देखील चात्यांकडून केली जात आहे.

युवराज सिंगचे भारताच्या क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान आहे. युवराजची आत्ता पर्यंतची कामगिरी बगता त्याच्या जर्सीचा 12 क्रमांक कोणालाच देण्यात येऊ नये, अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी शार्दुल ठाकूरही आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 क्रमांकाची जर्सी घालून उतरला होता, तेव्हाही सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत त्याला 10 क्रमांकाची जर्शी बदलायला लावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP