fbpx

‘और फिर आए युवराज सिंग… धागा खोल दिये,”

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगला प्रारंभ व्हायला अगदी काही दिवसच उरले आहेत. मुंबईने २०१९ साठीच्या लिलावात त्यांनी अगदी अखेरच्या क्षणाला युवराज सिंगला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. युवराज प्रथमच मुंबईकडून खेळणार आहे.

सिक्सर किंग युवराजने आयपीएलपूर्वीच्या सरावसत्रात सहभाग घेत जोरदार फटकेबाजी केली. मुंबई इंडियन्सनेही युवराजचे भरभरून स्वागत केले. मुंबईच्या सराव सत्रात युवीनंही नेट्समध्ये कसून सराव केला. त्याच्या या सरावाचा व्हिडीओ मुंबईने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि तो चांगलाच व्हायरल होत आहे.

”और फिर आए युवराज सिंग… धागा खोल दिये,” असे कॅप्शन मुंबईनं युवीच्या व्हिडीओखाली पोस्ट केला आहे.

http://https://twitter.com/mipaltan/status/1106207458496782337