मुंबई : ऋषभ पंतने मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाबाद शतक ठोकले. या दमदार कामगिरीमुळे त्याने टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे. पंतने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलेच शतक झळकावले आहे. कोणत्याही क्रिकेट खेळाडूसाठी त्याचे पहिले शतक हे नेहमीच खास असते. पण, पंतची ही खेळी केवळ त्याच्यासाठीच नाही तर टीम इंडियासाठीही खास ठरली. कारण त्याच्या नाबाद १२५ धावांच्या जोरावर भारताने तिसरा एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. भारताने इंग्लंडविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी बाजी मारली. तब्बल ८ वर्षांनंतर इंग्लंड संघ मायदेशातील एकदिवसीय मालिकेत पराभूत झाला आहे. भारतीय संघ आता आगामी काळात एकदिवसीय आणि टी-२० मालिकांसाठी वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे.
या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा भारताची ३८ धावांवर ३ गडी बाद अशी अवस्था होती. पंतने प्रथम सूर्यकुमार यादवसोबत ३४ धावांची भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढलं. त्यानंतर हार्दिक पंड्यासोबत दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १३३ धावांच्या भागीदारीने इंग्लंडला पराभावकडे खेचले. त्यानंतर इंग्लंड संघाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. ऋषभ पंतने या सामन्यात शतकीय खेळी साकारली. आता पंतच्या या कामगिरी मागे कोणत्या खेळाडूचा हात आहे हे समोर आले आहे. याबाबतचा खुलासा एका ट्विटने केला आहे.
मँचेस्टरमधील ऋषभ पंतच्या शतकीय खेळीनंतर युवराज सिंगने त्याचे अभिनंदन करण्यासाठी एक ट्विट केले होते. युवराज ने या ट्वीटमध्ये लिहिलेल्या माहितीप्रमाणे असे वाटते की, ऋषभ पंतच्या कामगिरी मागे त्याचाच हात होता. युवराजने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “४५ मिनिटांचे संभाषण सार्थकी लागले असून त्याचे फळ मिळाले. ऋषभ पंत चांगला खेळला. तुम्ही तुमचा डाव असा बनवला पाहिजे. हार्दिकलाही दमदार फलंदाजी करताना पाहून आनंद झाला.”
Looks like the 45 minute conversation made sense 😅!! Well played @RishabhPant17 that’s how you pace your ininings @hardikpandya7 great to watch 💪 #indiavseng
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 17, 2022
युवराजचे ट्विट वाचल्यानंतर असे दिसते की, तिसर्या सामन्यापूर्वी त्याने पंतशी संवाद साधला होता. मात्र, या दोघांमध्ये काय बोलणे झाले, याचा खुलासा युवराजने केला नाही. पण, एक गोष्ट नक्की, युवराजच्या शब्दांचा पंतवर नक्कीच भरपूर परिणाम झाला आणि त्याने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये पहिले एकदिवसीय शतक झळकावले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- Sanjay Raut | राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापूर्वी राऊत भावूक! म्हणाले, “मला पॉइंटेड केलं जातंय”
- Kishore Patil : शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत – किशोर पाटील
- Presidential election | नितीन राऊतांचे मत बाद करण्याची बबनराव लोणीकरांची मागणी
- Rohit Pawar : “…साठी राज्य सरकारने केंद्राला भाग पाडावं”, रोहित पवारांची मागणी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<