युवराज सिंगने संघ निवड समितीवर केले गंभीर आरोप, म्हणाला…

yuvraj-singh

मुंबई : निवड समितीकडून अनुभवी खेळाडूंच्या ऐवजी आवडणाऱ्या खेळाडूंची निवड केली जाते, असा आरोप भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने केला आहे. २०१९च्या विश्व चषकाच्या टीमचे उदाहरण देत युवराज सिंगने निशाणा साधला. तर ही चूक टी 20 विश्व चषकाची टीम निवडताना करू नका, असा सल्लाही त्याने दिला आहे.

युवराजने सोशल मीडियावरील एका लाईव्ह चॅटदरम्यान म्हटले की, २०१९ विश्वचषकात अत्यंत कमकुवत मधली फळी खेळवण्यात आली. त्यामध्ये अनुभवी खेळाडूंऐवजी रिषभ पंत आणि विजय शंकरसारख्या कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले होते.

२०१९च्या विश्वचषकात मधल्या फळीत भारतीय संंघाची रणनीती काय होती, हे मला समजली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा धावा काढत होते. परंतु विजय, पंत मधल्या फळीत खेळत होते. हे खेळाडू युवा होते. त्यांना फारसा अनुभव नव्हता.

तर अंबाती रायडूला शेवटपर्यंत भारतीय संघातून वगळण्यात आले. तुम्ही कोणत्याही खेळाडूबरोबर अशाप्रकारचा व्यवहार करू शकत नाही. रायडू न्यूझीलंडला गेला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.मात्र त्याला अनुभव होता. त्याला विश्वचषकात संधी मिळाली नाही कारण, आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली नव्हती. अशा निर्णयांना विरोध करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मला अशक्य असे वाटत नाही ! विराट कोहलीने आपल्या फलंदाजीबाबत केला मोठा खुलासा

तसेच जेव्हा मी २००३च्या विश्वचषकात खेळलो होतो, तेव्हा मी नवीन होतो तरीदेखील आधी ४० ते ५० सामने खेळले होते. तुम्ही ३-४ सामने खेळणाऱ्या खेळाडूंंबरोबर विश्वचषक खेळू शकत नाही. आता टी२० विश्वचषक येणार आहे. यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या खेळाडूंपेक्षा अनुभवी खेळाडूंची आवश्यकता आहे.

निवडकर्त्यांना संघाच्या अशा निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. परंतु शेवटी निवडकर्ते तर काय बोलणार, ते स्वत:च ४-५ सामने खेळलेले असतात. तेदेखील तसाच विचार करत असणार. संघाबद्दल काही माहित नाही आणि विचार करायचा की, हा खेळाडू मला आवडतो तसेच चांगले शॉट्स खेळू शकतो त्यामुळे त्याला टी२० विश्वचषकात संधी दिली जाते,” असेही तो पुढे म्हणाला.

गब्बर इज बॅक : मोठ्या खेळीसाठी शिखर उत्सुक