युवराज सिंगने घेतली ऋषभ पंतची बाजू, पहा काय म्हणाला…

टीम महाराष्ट्र देशा:- भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा चौथ्या क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी करत नाहीये.त्यामुळे सध्या त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. मात्र त्याच्यावर चौफेर टीका होत असताना भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग याने त्याची बाजू घेत त्याला जपण्याचा सल्ला दिला आहे. पंतवर काम सुरू असून त्याच्यावर अतिरिक्त दबाव टाकू नका असे युवराज म्हणाला आहे.

युवराज म्हणाला की, पंतशी सध्या एखाद्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. तसेच पंतची धोनीसोबत तुलना करू नये असेही नका. कारण धोनी एका दिवसात नाही बनलेला. त्याला सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी अनेक वर्ष लागली. त्यामुळे त्याला पर्याय मिळण्यासही काही काळ जावू द्यावा लागेल असेही युवराज म्हणाला.

तसेच वर्ल्डकपसाठी अजून एक वर्षाचा अवधी असल्याने पंतवर काम करण्यास बराच वेळ असल्याचेही तो म्हणाला. तसेच त्याच्यावर दबाव टाकत गेल्यास तो आपला सर्वोत्कृष्ठ खेळ करू शकणार नाही, असेही युवी यावेळी म्हणाला म्हणाला.

दरम्यान सोमवारी माजी कसोटीपटू  व्ही.व्ही.एस लक्ष्मणने त्याची बाजू घेत म्हंटले होते की,ऋषभ पंत हा आक्रमक खेळणारा फलंदाज आहे. पण, चौथ्या स्थानावर नेमकी कशी फलंदाजी करायची असते याचा अंदाज त्याला नाही. त्यामुळे त्याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवायला हवे असे मत त्याने व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या