सिक्सर किंग पुन्हा पंजाबकडून खेळणार

Yuvraj Singh

 

मुंबई: आपल्या फलंदाजातून सगळ्यांचे छक्के उद्दवणारा क्रिकेटपटू युवराज सिंग जाब क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी पुनित बाली यांनी युवराज खेळण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.

पुनीत यांच्या विनंतीनंतर युवराज सिंगने निवृत्तीमधून बाहेर येत क्रिकेटच्या रणांगणात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा पुनरागमन करणारआहे याबाबत त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सेक्रेटरी जय शहा यांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे. यामध्ये त्याने फक्त पंजाबसाठीच खेळायला मिळायला हवे असे नमूद केले आहे.

भमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग यांच्या सोबत नेटमध्ये सराव करीत असताना युवराज सिंगला अजूनही आपल्यामध्ये क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याचे जाणवले. तो यावेळी म्हणाला, या सर्व खेळाडूंना मार्गदर्शनाची गरज आहे. माझ्याकडून त्यांना मोलाच्या टिप्स मिळू शकतात. याचसह मधल्या काळात क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही मी चांगली फलंदाजी करीत होतो. त्यामुळे पंजाबसाठी क्रिकेट खेळायला हरकत नसल्याचे युवराज सिंग म्हणाला आहे. त्यांमुळे आता आयपीएलमध्ये युवराजची फटकेबाजी बघण्यास सगळेच उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांना दोन दिवसांत प्रश्नपेढी मिळणार; उदय सामंत

माझी पण इच्छा आहे… माझ्या नावावर कोणी अशी बिल्डिंग करावी, पवारांनी उडवली कंगनाची खिल्ली

शिवसेना दाऊदला घाबरते, आठवलेंचा जोरदार प्रहार