‘सिक्सर किंग’ युवराज सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

टीम महाराष्ट्र देशा– आयपीएलच्या बाराव्या पर्वामध्ये युवराज सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने काल झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये एक कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले आहे.

लिलावाच्या पहिल्या फेरीमध्ये युवराजला कोणत्याही संघाने विकत न घेतल्याने दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा त्याचा लिलाव करण्यात आला.लिलावाच्या दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. 300 पेक्षा अधिक खेळाडूंचा या लिलाव प्रक्रियेत सहभाग होता आणि त्यापैकी केवळ 70 खेळाडू नशीबवान ठरले. पण, युवराजचे मुंबई इंडियन्स संघात जाणे सर्वांना सुखद करणारे ठरले.