जेव्हा युवराज भेटतो त्याच्या आवडत्या अभिनेत्रीला ……..

भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग यांचे अनेक चाहते आहेत.त्यांचे चाहते त्याला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात,पण युवराजचे अनेक चाहते असले तरी युवराज मात्र अगदी लहानपणी पासून एका अभिनेत्रीचा चाहता आहे.ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलीवूडची सिमरन आणि सुपर मॉम काजोल आहे.
तुम्ही विचार करा की, जर आपल्या फेव्हरेट स्टार्सची अचानकच भेट होत असेल तर काय अवस्था होईल? अशी अवस्था आपल्या युवीची झाली. होय, युवराजच्या आनंदाला तेव्हा पारावार उरला नव्हता, जेव्हा युवराजचा अचानकच त्याच्या फेव्हरेट स्टारशी आमना-सामना झाला. त्याचे झाले असे की, युवराज सिंग विमानतळावर होता. त्याची फ्लाइट काही तास उशिराने असल्याने तो फ्लाइटची प्रतीक्षा करीत होता. मात्र अचानकच त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्याच्यासमोर अचानकच त्याची फेव्हरेट स्टार काजोल उभी राहिली.

काजोलला बघून, युवराज दंग राहिला. दोघांमध्ये बराच वेळ गप्पा गोष्टी रगंल्या. पुढे युवराजने काजोलसोबत एक सेल्फीही काढली. शिवाय सेल्फी त्याने सोशल अकाउंटवर शेअरही केली. त्याच्या कॅप्शनमध्ये युवराजने लिहिले की, ‘जर तुमची फ्लाइट उशिराने असेल आणि याच दरम्यान तुमची तुमच्या फेव्हरेट स्टारशी भेट होत असेल तर तुमचा दिवस आनंदात जाईल यात शंका नाही.

काजोलने ही या फोटोला चांगला प्रदिसाद दिला. आपल्याला ही युवराजला भेटून फार आनंद झाला असे तिने व्यक्त केले  आहे.Loading…
Loading...