आता प्लास्टिकवर बंदी घालण्याची वेळ; आदित्य ठाकरेंकडून भाजपला प्लास्टिकची उपमा

मुंबई: काही वर्षापूर्वी प्लास्टिक हे पर्याय म्हणून पाहिलं जात होत आता तेच भारी पडत आहे. मात्र, आता प्लास्टिकवर बंदी घालण्याची वेळ आली असल्याच म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. पालघर लोकसभेच्या निकालानंतर भाजप शिवसेनेमध्ये चांगलाच संघर्ष पहायला मिळत आहे. याच दरम्यान उद्या भाजपध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अस असली तरी शिवसेनेकडून भाजपला चांगलच धारेवर धरल जात आहे.

केंद्र आणि राज्यातील शिवसेना- भाजप युतीला आता चार वर्ष पूर्ण होयला आली आहेत. मात्र, सुरुवातीपासून शिवसेनेकडून घेण्यात आलेली विरोधाची भूमिका अद्याप थांबलेली नाही, पालघर लोकसभा निकालानंतर हा तणाव आणखीनच वाढताना दिसत आहे. शिवसेनेकडून या आधीच एकाला चलो रे चा नारा देण्यात आला आहे. या सर्व घडामोडीमध्येच भाजपाध्यक्ष अमित शहा हे उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

दरम्यान, या भेटीसंदर्भात आदित्य ठाकरे यांना विचारल असता त्यांनी भाजपला प्लास्टिकची उपमा देत टीका केली.