आता इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेच्या वाघांचे संरक्षण….

कोहापूर : इंदोरीकर महाराजांचा आज कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापिठात नियोजित कार्यक्रम आहे. मात्र अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा इंदुरीकरांच्या या कार्यक्रमाला विरोध आहे. स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम नको अशी आक्रमक भूमिका या संघटनांनी घेतली आहे. तरी, या संघटनेचे कार्यकर्ते विद्यापीठात जाऊन जाबही विचारणार आहेत. तर हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील पुरोगामी संघटनेंनी दिला आहे. यावर आता कोल्हापूरमध्ये युवासेना चांगलीच आक्रमक होत मैदानात उतरली आहे.

कोल्हापूरमध्ये युवसेना कमालीची आक्रमक झाली होत इंदोरीकारांच्या समर्थनात उतरली आहे. जर कोणी इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवसेना स्टाईल जशाच तस उत्तर देऊ अशी कठोर भूमिका युवासेनेने घेतली आहे. तर इंदोरीकर महाराज यांच्या शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमाला युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित राहून सुरक्षा पुरवण असल्याची माहिती समोर येत आहे.

Loading...

दरम्यान, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. या बेताल वक्तव्याने इंदुरीकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. इंदोरीकरांविरुद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई न केल्याने आता अहमदनगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य समन्वयक रंजना गावंडे यांनी नोटिस बजावली आहे. इंदोरीकर महाराजांवर 15 दिवसांत कारवाई न केल्यास यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करणार असल्याचे रंजना गावंडे यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. कीर्तनकार कसे असतात ? याची व्याख्याच जिथे करवत नाही ते कीर्तन म्हणजे इंदुरीकरांचे. सातत्याने महिलांचा अपमान करणे, पांचट भाषा वापरणे, भेदभावा संदर्भात संदेश देणे.यासंदर्भात सुरुवातीला मी जे बोललो ते योग्यच बोललो ,ग्रंथाचा आधार घेऊन बोललो असे सांगणारे अचानकच पलटले आणि मी ते वाक्य बोललोच नाही असे लेखी लिहून दिले आणि तिथेच आणखी खोलात पाय अडकायला सुरुवात झाली. जरी पीसीपीएनडीटी आणि सायबर सेलने तुर्तास दिलासा दिला असला तरी अनेक कीर्तने सध्या पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर तृप्ती देसाईंची दहशत आहे, कारण महिला सन्मानासाठी आम्ही मागेपुढे पाहत नाही हा आमचा पण इतिहास आहे. असा घणाघात तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट लिहून केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका