नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विदयापीठ डोकलामचेही कारण देईल

मुंबई विद्यापीठाच्या ‘तारीख पे तारीख’वर आदित्य ठाकरेंचा निशाना

मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी रोज ‘तारीख पे तारीख’ असा खेळ सुरु असल्याच दिसत आहे. निकाल रखडल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल आहे. आता तर विद्यापीठाने कारण देण्याचा उच्चांक केला असून बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं अजब कारण मुंबई हायकोर्टात दिलं आहे. या सर्व गोष्टींवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठवर निशाना साधत ‘नशीब डोकलाम विषय संपला नाहीतर डोकलाम आणि नॉर्थ कोरियाचं कारण देखील उशीर झाला म्हणून देतील’ असे ट्विट करत निशाना साधला

दरम्यान मुंबई विद्यापीठाने निकाल रखडण्यासाठी मुंबईतील पावसावर खापर फोडल्यानंतर आता बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं मुंबई हायकोर्टात सांगितल आहे. तर याआधी वेगवेगळी कारणे देत सहावेळा निकाल पुढे सरकवला आहे. आता १९ सप्टेंबरपर्यत निकाल जाहीर करू अस सांगण्यात आल आहे.