आदित्य ठाकरे करणार पूरग्रस्त सांगली कोल्हापूरचा दौरा

टीम महाराष्ट्र देशा: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी पूरग्रस्त सांगली, सातारा व कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी आदित्य पूरग्रस्त भागातील गावांना भेट देणार आहेत.

कोल्हापूर व सांगलीमध्ये महापुराने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामध्ये उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभारण्यासाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. राज्य सरकारकडून जवळपास ६८०० कोटींच्या मदतीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तर अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष पूरग्रस्तांना मदतीला धावून आले आहेत.

Loading...

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेसाठी जनआर्शीवाद यात्रा महत्वाची नसून आमचे सर्व लक्ष पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगलीकडे असल्याचं सांगितलं होत. या भागामध्ये पूर ओसरला तरी साफसफाई आणि पूरग्रस्तांना मदत पोहोचवणं गरजेचं असल्याने आम्ही त्याला अधिक महत्व देणार आहोत, असं प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं होत.

पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी सांगली जिल्ह्यातील पूर बाधित हरिपूर येथे भेट देतील. त्यानंतर ते सांगलीत व्यापाऱ्यांशी संवाद साधुन ब्रह्मनाळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील