ठाकरे घराण्यातील यंग जनरेशन आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र

फुटबॉल प्रेमाने घडवली भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. हे दोघे कधी एकत्र येणार हा राजकीय चाणक्यांना पडलेला प्रश्न आहे. मात्र ठाकरे घराण्यातील यंग जनरेशन म्हणजे आदित्य आणि अमित ठाकरे हे एकत्र आले आहेत. पण ते राजकारणासाठी नाही तर फुटबॉलवर असलेल्या प्रेमापोटी.

राज यांचे पुत्र अमित हे फुटबॉलपटू आहेत. तर आदित्य हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष. सध्या अमित ठाकरे यांच्या पुढाकारातून प्रीमिअर फुटसाल लीग या फुटबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आल आहे. याच निमित्ताने हे दोघे काल रात्री लोअर परळमधील ख्यातनाम हॉटेलमध्ये या भेटले होते. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूही सहभागी झाले आहेत. या खेळाडूंना भेटण्याची इच्छा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली होती. यानिमित्त आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट झाली.