VIDEO: नितीन आगे हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने नाही ; नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

टीम महाराष्ट्र देशा: नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न युवा पँथर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. नितीन आगे प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं झाला नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री आज (रविवार) नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांचा हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. नंतर या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल. मात्र,यापूर्वीही मुख्यमंत्र्याचा ताफा अडवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

पहा संपूर्ण व्हिडीओ 

You might also like
Comments
Loading...