“राज्य संकटात असताना “युवक काँग्रेस” देत आहे मदतीचा हात”

Satyajit Tambe

मुंबई : सध्या देशभरामध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गजन्य रोगामुळे देशावर मोठे संकट कोसळले आहे. संबंध देशभरातील लोक आपल्या जीवाची काळजी घेत प्रचंड दहशतीखाली आहेत. राज्यावर, देशावर प्रचंड मोठे संकट आले आहे त्यावर उपाययोजना म्हणून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश एकवीस दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. अश्या परिस्थीतीत महाराष्ट्रा मधे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस नागरिकांना आधाराचा हात देण्याचे काम प्रदेशाध्यक्ष मा. सत्यजित तांबे ह्यांच्या नेतृत्वाखाली करंत आहे अशी माहीती प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी दिली.

राज्यामधे लॉक डाऊन ची घोषणा मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ह्यांनी केल्यानंतर सर्व हॉटेल्स, भोजनालय बंद करण्यात आली. ह्यावेळी पुण्यातील स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला, ह्यावेळी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ह्यांच्या मार्गदर्शनात प्रदेश युवक कॉंग्रेस चे महासचिव मानस पगार ह्यांच्या नेतृत्वात पुण्यातील विद्यार्थ्य़ांना मोफत जेवण देण्याचे काम युवक कॉंग्रेसच्या वतिने करण्यात आले. ह्यावेळी पुण्यातिल हजारो विद्यार्थ्यांना जेवणाचे पार्सल वितरीत करुन ह्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम केल्या गेले. हे काम करंत असतांना टोकण सिस्टीम सुरक्षीत अंतर ह्या सगळ्या गोष्टींचे पालन करंत, संचार बंदीच्या नियमांमधे कुठेही अडथळा येणार नाही ह्याची काळजी सुद्धा घेतल्या गेली.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, लॉक डाउन च्या काळामधे राज्यातील सर्व ब्लड बँकेमधे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ह्यांनी सांगितले ह्यावेळी क्षणाचाही विलंब न करता प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ह्यांनी राज्यभरातील युवक कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. व त्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरात प्रत्येक शासकिय रुग्नालयामधे जावुन , सिस्टीम ने , संचारबंदीच्या नियमांना अडथळा होणार नाही अस्या पद्धतिने युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते रक्तदान करंत आहेत. देश व राज्य संकटात असतांना, राज्यातिल नागरिकांना मदतीचा हात देण्याचे पवित्र कार्य युवक कॉंग्रेस च्या माध्यमातुन राज्य भरात सुरु आहे. हे राज्य कोरोणासारख्या मोठ्या संकटातुन बाहेर ह्यावे ह्यासाठी प्रशासनाला पुर्ण मदत करण्याचे आदेश मा. प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील ह्यांनी दिले असल्याची माहीती प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी दिली.