युतीसाठी शिवसेनेने ठेवल्या भाजपसमोर ‘या’ अटी

टीम महाराष्ट्र देशा : तीन राज्यातील पराभवामुळे भाजप खचलेली असतानाच शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडळायला मोठी केली केलीय. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घ्यावी आणि युती करायची असेल तर सन्मानजनक जागा वाटप करा, अशा दोन मागण्या शिवसेनेने भाजपसमोर ठेवल्या आहेत.

Loading...

१५५ जागा दिल्या तरच युती होणार असल्याचा संदेश शिवसेनेने भाजपला पाठवला आहे. भाजपकडून हिरवा कंदील मिळाला नसला तरी तडजोडीचा आकडा काढण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मागण्या पूर्ण झाल्या तरच शिवसेना भाजपसोबत युती करणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

सध्या भाजपकडे १२१ तर शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. दोघांचेही विद्यमान आमदार १८४ आहेत. ते वगळता १०४ जागा शिल्लक राहतात. त्यापैकी ८५ जागा शिवसेना भाजपकडे मागत आहे. परंतु त्यांची बेरीज १४८ पर्यंत जाते.

या जागा भाजप शिवसेनेला देऊ शकत नाही. मात्र, ७५ जागा शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार आहे. त्यामुळे १३८ जागांवर शिवसेना युतीसाठी तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपच्या वाट्याला १५० जागा येतील.Loading…


Loading…

Loading...