fbpx

युजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका

टीम महाराष्ट्र देशा- काल झालेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सामन्यात कांगारूंना पराभवाचा धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला. या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. मात्र या सामन्यात युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला. चहलने या सामन्यात तब्बल सहा विकेट घेतल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.

ऑस्ट्रेलियात ६ गडी बाद करणारा युझवेंद्र चहल पहिला फिरकीपटू ठरला आहे. याआधी रवि शास्त्री यांनी १९९१ साली १५ धावा देवून ५ विकेट घेतल्या होत्या. चहलच्या आधी फक्त ७ फिरकीपटूंना एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेता आले आहेत. अजित आगरकरच्या नावे ऑस्ट्रेलियात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीतील प्रदर्शन होते. त्याने ९ जानेवारी २००४ साली मेलबर्न येथेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४२ धावा देताना ६ गडी बाद केले होते. त्याची चहलने बरोबरी केली.

याआधी भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत 2-1असा विजय मिळवला आहे. तर टी20 मालिकेत तुल्यबळ लढती झाल्या आणि 1-1 अश्या  बरोबरीट मालिका संपली. यामुळे भारत हा पहिलाच देश ठरला आहे ज्याने एका ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी, वन-डे आणि टी20 मालिकेत पराभव स्विकारलेला नाही.

1 Comment

Click here to post a comment